१३ वे शतक - रायगड आणि आसपासचा परिसर देवगिरीकर यादवांच्या ताब्यात होता.
१४ वे, १५ वे आणि १६ वे शतक - मुस्लिमांच्या, बहमनी साम्राज्याचा ताबा होता.
सन १६५६ शिवाजी महाराजांनी जावळीच्या चंद्रराव मोरे ह्यांचा पराभव करून त्यांचा सर्व प्रदेश जिंकून घेतला. त्यामध्ये रायरीचा ताबा महाराजांकडे आला.
सुमारे १५ वर्षांमध्ये हिरोजी इंदुलकरांनी बालेकिल्ला, राजवाडा, सदर, मंदिरे, नगरपेठ, दारूखाना, तटबंदी आणि बुरुज यासह ३५० वास्तूंची निर्मिती करून हा अभेद्य किल्ला बांधला.
जेष्ठ शुद्ध त्रयोदशी शके १५९६ म्हणजे ६ जून १६७४ रोजी शिवाजी महाराजंचा वेदोक्त राज्याभिषेक कार्यक्रम झाला.
चैत्र पौर्णिमा, हनुमान जयंती शके १६०२ म्हणजे ३ एप्रिल १६८० रोजी शिवाजी महाराजांचे रायगडावर महानिर्वाण झाले.
२० जुलै १६८० रोजी शंभूराजांचे मंचकारोहण झाले.
१६ फेब्रुवारी १६८१ रोजी शंभूराजांचा राज्याभिषेक संपन्न झाला.
९ फेब्रुवारी १६८९ रोजी राजाराम महाराजांचे मंचकारोहण झाले.
२५ मार्च १६८९ रोजी इतिकदखान रायगडाशी पोहोचला.
५ एप्रिल १६८९ रोजी राजाराम महाराज रायगडावरून निसटून प्रतापगडकडे आणि नंतर जिंजीला गेले.
३ नोव्हेंबर १६८९ रोजी सव्वा सात महिन्यांच्या वेढ्यानंतर रायगडाचा ताबा मुघलांकडे गेला.
१७०७ मुघलांचा सरदार राजा शिवसिंग हा रायगडाचा किल्लेदार होता. औरंगजेबाचा मृत्यू झाल्यानंतर त्याने उत्तरेकडे जाताना येथील कारभार जंजिरेकर सिद्दी याकूतखानाकडे सोपविला. सिद्दी जोहार हा रायगडाचा किलेदार बनला.
५ जून १७३३ रोजी रायगड पुन्हा मराठेशाहीच्या ताब्यात आला.
१७३५ ते १७७२ या काळात यशवंत महादेव पोतनीस हे शाहू छत्रपतींतर्फे रायगडाचा कारभार पाहत होते तर गडाच्या संरक्षणाची जबाबदारी पेशवे यांचेकडे होती.
५ जून १७३३ रोजी रायगड पुन्हा मराठेशाहीच्या ताब्यात आला.
१० मे १८१८ रोजी कर्नल प्रॉथर याने किला पेशव्यांकडून जिंकून घेतला आणि किल्ला ब्रिटीशांच्या ताब्यात गेला.