मंडळाच्या स्थापनेची सभा - ३० मे १८९५ रोजी लोकमान्य टिळकांनी पुण्याच्या हिराबागेत जंगी सभेचे आयोजन केले. या सभेत रायगडावरील महाराजांच्या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी एका मंडळाची स्थापना झाली. तेच हे 'श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ'.
किल्ले रायगडावरील पहिला कार्यक्रम - १८९६ साली पहिल्यांदा शिवजन्मोत्सव कार्यक्रम मंडळाने आयोजित केला होता.
जीर्णोद्धारासाठी यशस्वी संघर्ष - मंडळाने सन १९२६ साली आज आपण पाहतो ती शिवाजी महाराजांची जीर्णोद्धारीत समाधीची वास्तू बांधली.
स्थानिक उत्सव समिती, महाड स्थापना - शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रमाची व्यवस्था अधिक चांगल्या प्रकारे व्हावी यासाठी प्रचारक कै. मोरोपंत पिंगळे यांच्या प्रेरणेने स्थानिक उत्सव समिती, महाड याची स्थापना करण्यात आली.
३०० वा शिवराज्याभिषेक सोहळा - या कार्यक्रमासाठी पू. सरसंघचालक कै. बाळासाहेब देवरस उपस्थित होते.
३०० वा शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रम - किल्ले रायगडावरचा आजपर्यंतच्या इतिहासातला सर्वात मोठा कार्यक्रम. सुमारे ४०,००० शिवभक्त उपस्थित. तत्कालिन पंतप्रधान कै. इंदिराजी गांधी उपस्थित होत्या.
साली सिंहासनावरील मेघडंबरीची स्थापना - मंडळाच्या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र राज्य सरकारने तत्कालिन महामहीम राष्ट्रपती कै. ग्यानी झैलसिंग यांच्या शुभहस्ते मेघडंबरीची स्थापना केली.
किल्ले रायगड विकास आराखडा - तत्कालिन मुख्यमंत्री कै. शंकरराव चव्हाण यांचेशी झालेल्या चर्चेनुसार मंडळाने सर्वप्रथम किल्ले रायगड विकास आराखडा तज्ञांचे सहाय्याने तयार करून महाराष्ट्र राज्य सरकारकडे सुपूर्त केला.
१९९६ रायगड रोप वे - किल्ले रायगड विकास आराखड्यातील मंजूर झालेला रोप वे मंडळाने जोग इंजिनियरिंग लिमिटेड, पुणे यांचे सहकार्याने सुरु केला. त्याचे उद्घाटन तत्कालिन पू. सरसंघचालक श्री. रज्जुभैय्या यांचे शुभहस्ते झाले.
१९९९ साली किल्ले रायगडाला रु. १ कोटीचा निधी - तत्कालिन पंतप्रधान कै. अटलजींनी केंद्रीय पुरातत्व खात्याला रायगडाच्या सुधारणांसाठी रु. १ कोटी इतका निधी दिला.
२०१२ सुधारित किल्ले रायगड विकास आराखडा - मंडळाने स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने २०१२ साली सुधारित किल्ले रायगड विकास आराखडा तयार केला.
२०१५ सुधारित किल्ले रायगड विकास आराखडा मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचेकडे सुपूर्त - मंडळाने स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने २०१२ साली केलेला सुधारित किल्ले रायगड विकास आराखडा मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचेकडे शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रमात सुपूर्त केला.
२०१६ किल्ले रायगड विकास आराखडा प्राधिकरणात सहभाग - मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी रायगडावरील शिवराज्याभिषेक कार्यक्रमात किल्ले रायगड विकास आराखडा प्राधिकरण स्थापण्याची घोषणा केली. या प्राधिकरणात मंडळाच्या आजपर्यंतच्या कार्याचा विचार करून ३ जणांना प्राधिकरणाचे सदस्य करून घेण्यात आले.
२०१७ छत्रपती शिवाजी अध्यासनाची स्थापना - शिवचरित्र आणि मराठेशाहीचा इतिहास प्रकाशित करण्यासाठी मंडळाने वीर बाजी पासलकर स्मारक, पुणे येथे छत्रपती शिवाजी अध्यासनाची स्थापना केली.