१८५७ नानासाहेब पेशवे जयंती समारोह
   
श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ
आणि
१८५७ चे स्वातंत्र्यसेनानी नानासाहेब पेशवे स्मारक समिती


यांचे वतीने सप्रेम नमस्कार

भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामधे १८५७ च्या स्वातंत्र्य समराला विशेष महत्त्व आहे. काश्मीरपासून केरळपर्यंत इंग्रजांविरुद्ध झालेला हा उठाव अभूतपूर्व होता. झाशीची राणी, तात्या टोपे, रंगो बापुजी गुप्ते अशा अनेक वीरांनी याचे नेतृत्व केले.

मात्र या अखिल भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे नियोजन करण्यात सिंहाचा वाटा होता तो नानासाहेब पेशवे यांचा. इंग्रजांशी प्रखर संघर्ष करणाऱ्या नानासाहेब पेशवे यांचा जन्म ८ डिसेंबर १८२४ रोजी रायगड जिल्ह्यातील कर्जत जवळच्या वेणगाव येथे झाला.

भारतीय इतिहासातील या महामानवाचा जन्म आपल्या महाराष्ट्रात झाला याचा आपल्याला अभिमान वाटणे स्वाभाविक आहे. या महान देशभक्ताचे चरित्र सर्वसामान्यांना कळणे आवश्यक आहे. म्हणून रविवार दि. ८ डिसेंबर २०२४ रोजी त्यांचा २०० वा जन्मदिन मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.

असाच भव्य कार्यक्रम रविवार दि. २३ मार्च २०२५ रोजी नानासाहेबांची कर्मभूमी बिठूर, कानपूर, उत्तरप्रदेश येथे आयोजित केला आहे. त्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री मा. योगी आदित्यनाथ उपस्थित राहणार आहेत.