किल्ला इतिहास
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या अवघ्या ५० वर्षांच्या आयुष्यात असामान्य कर्तुत्वाने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. कोकणातील एक सामान्य डोंगराला राजधानी बनविले आणि वैभव प्राप्त करून दिले. तोच हा किल्ले रायगड. महाराजांच्या वास्तव्यामुळे किल्ले रायगडला तीर्थाचे स्वरूप प्राप्त झाले. कोणत्याही ऋतूत गेले तरी रायगडाचे बदलते रूप आपल्याला काही तरी नित्य नवे दाखवीत राहते...